INTERNATIONAL JOURNAL OF NOVEL RESEARCH AND DEVELOPMENT International Peer Reviewed & Refereed Journals, Open Access Journal ISSN Approved Journal No: 2456-4184 | Impact factor: 8.76 | ESTD Year: 2016
Scholarly open access journals, Peer-reviewed, and Refereed Journals, Impact factor 8.76 (Calculate by google scholar and Semantic Scholar | AI-Powered Research Tool) , Multidisciplinary, Monthly, Indexing in all major database & Metadata, Citation Generator, Digital Object Identifier(DOI)
देवाच्या महान कृपेने येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारा स्वर्गीय स्थानांवर उंचविला गेला आहे. पौल निश्चितार्थाने म्हणतो की, “आपण (इफिसकर) आपले अपराध व आपली पातके ह्यांमुळे मृत झालेले होता; त्या पातकांमध्ये तुम्ही पूर्वी चालत होतां व आपल्या दैहिक वासनांना अनुरुप असे वागलो…” म्हणजे आपली तारणापूर्वीची अवस्था पापांमुळे मृत, पातकांमध्ये चालणे, दैहिक वासनांना अनुरुप असे वागणे अशी होती. (इफि.2:1-6) परंतू ते आता येशू ख्रिस्तावरील विश्वासाव्दारे येशू ख्रिस्ताबरोबर जिवंत केले गेले आहेत. म्हणजे हे की पापाने मनुष्य मृतवत असा गणण्यात आला होता व तो जिवनाला मुकला होता. हे येशू ख्रिस्तामध्ये जिवंत होणे, उठविले जाणे व स्वर्गीय स्थानांमध्ये बसविले जाणे हे त्यांचे तारण होते. हे तारण त्यांच्या सत्कृत्यांमुळे किंवा त्यांच्या समाज अथवा राजकिय किंवा धार्मिक स्थानांमुळे त्यांना देण्यात आले नाही याची प्रेषित पौल त्यांना आठवण देतो आणि सांगतो की: (कृपेने तुमचेतारण झालेले आहे;) कारण हे की सुवार्ता सांगितल्यावर ती त्यांनी ऐकली आणि तीच्यावर विश्वास ठेवला. त्याचा परिणाम हा झाला की ते जे मेलेले असे पापी त्यांना पुन्हा नविन जिवनामध्ये जिवंत केले गेले. त्यांना हे कळणे गरगजेचे होते की पाप ठार मारत होते. अशा या मृतांनी प्रभु येशूवर विश्वास ठेवला व त्यामुळे देवाने त्यांना नवीन जिवन देऊन त्यांच्या मृतावस्थेतून “ख्रिस्त येशूच्या ठायी त्याच्याचबरोबर केवळ “उठवलेच” नाही तर त्यांची स्थीति बदलून त्याच्याचबरोबर स्वर्गांत “बसविले;” असे असल्याकारणाने देवाच्या कृपेने ते आता ख्रिस्ताच्या शरीराचे अवयव बनविले गेले आहेत व त्यांना स्थानसुध्दा मिळाले आहे. ते यापुढे परके, उपरी व प्रवासी राहीलेले नसून स्वर्गीय राज्याचे भागिदार झालेले आहेत. हा नवा बदल पाहता पौल असे सांगू इच्छितो की यापुढे येशू ख्रिस्ताच्या अनुयायाने त्याचे जिवन देवाची हस्तकृती बनूण जगले पाहिजे. तीच त्याची या जगामध्ये खरी ओळख आहे. या पत्रामधील तीन महत्वाचे विचार असे की: देवाच्या कृपेने विश्वासणारा म्हणजे येशू ख्रिस्ताचा अनुयायी येशू ख्रिस्तामध्ये उंचविला गेला आहे, तो येशू ख्रिस्ताच्या शरीराचा म्हणजे मंडळीरूपी शरीराचा अवयव बनविला गेला आहे आणि त्यांमुळे त्याने येशू ख्रिस्ताला गौरविणारे जिवन जगावे. कारण की तो नवी सृष्टी व देवाची नवी हस्तकृति झाला आहे.
Keywords:
बायबल,देव,येशू,विश्वास,स्वर्ग,पौल,पाप
Cite Article:
"A review of the Epistle to the Ephesians by the Apostle Paul in the New Testament of the Bible.", International Journal of Novel Research and Development (www.ijnrd.org), ISSN:2456-4184, Vol.7, Issue 7, page no.1354-1363, July-2022, Available :http://www.ijnrd.org/papers/IJNRD2207151.pdf
Downloads:
000118758
ISSN:
2456-4184 | IMPACT FACTOR: 8.76 Calculated By Google Scholar| ESTD YEAR: 2016
An International Scholarly Open Access Journal, Peer-Reviewed, Refereed Journal Impact Factor 8.76 Calculate by Google Scholar and Semantic Scholar | AI-Powered Research Tool, Multidisciplinary, Monthly, Multilanguage Journal Indexing in All Major Database & Metadata, Citation Generator
Facebook Twitter Instagram LinkedIn